रैनाने केली इंग्रजांची दैना

suresh-raina
कार्डीफ – भारताच्या डावाची सुरुवात खराब झाल्यानंतर सुरेश रैना याने कमी चेंडूत केलेल्या दणदणीत शतकामुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात ३०४ धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीकरणा-या इंग्लंडने सातव्या षटकात शिखर धवन आणि विराट कोहली यांना बाद करत भारताला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी तिस-या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी केली. रहाणे ४१ धावांवर बाद झाला. शर्माही ५२ धावांवर बाद झाला. ही स्थिर झालेली जोडी बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रैना या जोडीने संघाला चांगल्या स्थितीत पोहचवले. रैना याने केवळ ७३ चेंडूत तीन षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमधील रैनाचे हे चौथे शतक ठरले आहे. त्याचबरोबर धोनीने कर्णधाराला साजेशी खेळ करीत (५२) अर्धशतकी खेळी खेळली. त्यानंतर जडेजा (९) आणि अश्विनने (१०) धावा करीत संघाला तीनशेच्या पार पोहचविले. इंग्लंडकडून वोक्सने सर्वाधिक ४ गडी, तर ट्रेडवेलने २ गडी बाद केले.

Leave a Comment