
मुंबई – वांद्रे पोलिस ठाण्यात सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातील हरवलेली महत्त्वाची कागदपत्रे सापडली असून तत्पूर्वी पोलिसांनी न्यायालयात २१ ऑगस्टला झालेल्या सुनावणीदरम्यान कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती दिली होती. तसेच ज्यावेळी घटना घडली त्यावेळची घटनेची नोंद करण्यात आलेली डायरीही हरवल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
हिट अँड रन प्रकरणातील कागदपत्रे सापडली
याप्रकरणासंबंधित ६३ पैकी केवळ सात साक्षीदारांचे जबाब नोंदवलेली कागदपत्रे उपलब्ध असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितल्यामुळे न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच कागदपत्रे शोधण्यासाठी आणि त्यावेळच्या तपास अधिका-यांना न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी पोलिसांना आणखी अवधी दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ सप्टेंबरला होणार आहे.
