मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मेट्रो-३चे भूमिपूजन

cm5
मुंबई – देशातील सर्वात मोठा मेट्रो प्रकल्प असलेल्या मुंबई मेट्रोच्या तिस-या फेजचे भूमिपूजन केंद्रीय नगरविकासमंत्री व्यैंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. हा प्रकल्प जपानच्या सहाय्याने पूर्णत्वास नेला जात असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, नसीम खान, वर्षा गायकवाड, खासदार गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या, गजानन किर्तीकर आदी उपस्थित होते.
cm3
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सर्वप्रथम मी नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडूंचे स्वागत करतो व आभार मानतो. मेट्रो-३ च्या उद्धघाटनाला निमत्रंण देताच त्यांनी आपले ठरलेले इतर कार्यक्रम रद्द करून येथे आले. मुंबईसह महाराष्ट्रात नागरीकरण वेगाने वाढत आहे. यासाठी जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आम्हचा प्रयत्न सुरु आहे. मागील चार-पाच वर्षात मुंबईतील वाहतुकीच्या प्रश्नांसह अनेक बाबींचा चेहरा-मोहरा बदललेला आहे. मुंबई मेट्रो-3 हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. अजून खूप कामे करायची आहेत केंद्राने सहकार्य करावे. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचा आमचा मानस आहे. याचबरोबर मुंबई शहर हे समुद्रकिनारी वसल्याने अनेक किचकट प्रक्रियांना सामोरे जावे लागते. याबाबत केंद्र सरकारने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात टाऊन प्लॅनिंग व अर्किटेक्चरचे देशातील तिसरी संस्था केंद्राने मुंबईत उभारावी. मुंबईतील खासदारांनी याबाबत पाठपुरावा करावा. राज्य सरकार आपले काम चोख बजावेल असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
cm4
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकदिलाने काम केले पाहिजे. कोणाचाही अपमान, अनादर होणार नाही याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला खडे बोल सुनावले.

Leave a Comment