
मुंबई – बिहार विधानसभेच्या दहा पोटनिवडणुकीचे आज निकाल आहेत आणि त्यातच राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे बांद्रा येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लालू प्रसाद यादव यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
लालू प्रसाद यादव अत्यवस्थेत, मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु
मुंबईत लालू प्रसाद यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती थोड्याथोड्या वेळाने कळवण्यात येईल असे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
