मुंबई महापौर बदलाच्या हालचालींना वेग

bmc
मुंबई – मुंबई महानगर पालिकेचे महापौरपद अनुसुचीत जमातीच्या महिलेसाठी राखीव असल्यामुळे अनेकांची नावे पुढे येत असून या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या महापौर बदलाच्या हालचालींना वेग आला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांची आणि विभागप्रमुखांची शिवसेना भवनमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली असून यावेळी महापौर पदाच्या नावांबाबतही चर्चा करण्यात आली. ९ सप्टेंबरला होणार महापौर बदलाची निवडणुक होणार आहे. भारती बावधने, यामिनी जाधव, स्नेहल आंबेकर या तीन नगरसेविकांची नावे महापौर पदासाठी पुढे येत आहेत. महापौर बदलासाठीचा माझा निर्णय अंतिम असेल असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेना चांगले काम करत असून विधानसभेत आपलाच विजय होईल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment