पेट्रोल पंप चालकांचा बंद मागे

petrol-pump1
मुंबई – विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांची मध्यस्थी केल्याने पेट्रोल पंप चालकांचा बंद मागे घेण्यात आला असून राज्य डिलर असोशिएशन आणि विनोद तावडे यांचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. महायुतीचे सरकार आल्यावर पेट्रोलपंप चालकांचा मागण्या पूर्ण करु असे आश्वासन तावडेंनी दिले आहे.

तत्पूर्वी या बंदमधून पुण्यातील पेट्रोलपंप संघटनेत उभी फूट पडल्यामुळे उद्यापासून होणाऱ्या प्रस्तावित बंदमध्ये पुण्यातील पेट्रोलपंप चालक सहभागी होणार नसल्याची माहिती संघटनेचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिली होती.

या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील वाहन धारकांनी पेट्रोलपंपावर धाव घेतल्यामुळे सर्व पंपांवर एकच गोंधळ उडाला होता. पेट्रोल पंप चालकांनी बंद मागे घेतल्यामुळे वाहन धारकांचा जीव भांड्यात पडला आहे.

Leave a Comment