इंटरनेट युजरची सर्वाधिक टक्केवारी फॉकलंडमध्ये

internet
आजच्या जगात इंटरनेट शिवाय आयुष्य ही कल्पना करणेही शक्य नाही अशी परिस्थिती असून जगातील बहुसंख्य लोकसंख्या या ना त्या कारणाने इंटरनेटशी जोडलेली आहे. प्रत्येक देश आपल्या नागरिकांना इंटरनेटने जोडण्यासाठी अनेक योजना राबवित आहेत. फिनलंड या देशाने तर इंटरनेट कनेक्टीव्हीटी हा नागरिकाचा हक्क असल्याचा कायदाही केला आहे.. सोशल प्रोग्रेस इंडेक्सच्या डेटाप्रमाणे भारत या देशांच्या यादीत खूपच मागे असून येथे इंटरनेट युजरचे प्रमाण अवघे १२.५८ टक्के इतकेच आहे.

जगात इंटरनेट युजरची टक्केवारी सर्वाधिक असलेल्या देशात फॉकलंडचा पहिला क्रमांक लागतो. अवघी २९३२ लोकसंख्या असलेल्या या देशात ही टक्केवारी ९६.९२ इतकी आहे. त्यापाठोपाठ आईसलंड ९६.२१ टक्के घेऊन दुसर्‍या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे आईसलंड येथे युरोपात इंटरनेटचा वेग सर्वाधिक आहे. शाळेत इंटरनेट, डिजिटल कंटेंट सुलभता आणि सुरक्षित सर्व्हर यात या देशाचा पहिला क्रमांक आहे. तीन नंबरवर नॉर्वे असून त्यांची टक्केवारी आहे ९५. कांही सवेक्षणात या देशात ही टक्केवारी १०० टक्के असल्याचा दावाही केला गेला आहे.तसेच येथे चाईल्ड पोर्नवर बंदी असून बाकी कोणतही सेन्सारशीप नाही.

चार नंबरवर स्वीडन ९४ टक्के, पाच नंबरवर डेन्मार्क ९३ टक्के, सहा नंबरवर नेदरर्लंड ९३ टकके, सातव्या स्थानावर लेक्झंबर्ग ९२ टकके असे क्रमांक असून नेदरर्लंड येथे दर दहा घरांमागे ८ घरांत इंटरनेट हायस्पीड कनेक्शन आहेत. आठव्या नंबरवर बर्म्युडा देश असून येथील टक्केवारी आहे ९१.३. येथे मोबाईल डेन्सिटीचे प्रमाण १२५ टक्के आहे. फिनलंड या यादीत नवव्या क्रमांकावर आहे आणि इंटरनेट हा येथील नागरिकांचा कायद्याने हक्क आहे. दहावा नंबर आहे न्यूझीलंडचा येथे टक्केवारी ८९.५१ अशी आहे. ११ व्या स्थानावर लिंचेस्टीन हा चिमुकला देश आहे. तेथे ८९.४१ अशी टक्केवारी आहे.

बाराव्या स्थानावर कतार हा अरब देश असून येथे सेंसारशिप कडक आहे. त्या पाठोपाठ बहारीन असून येथे टककेवारी ८८ टक्के आहे. चौदाव्या स्थानावर युके असून येथे ८७.०२ ट्क्के लोक इंटरनेट कनेक्ट आहेत. येथे १० वर्षांखालील २५ टक्के मुलांची स्वतःची ईमेल अकौंट आहेत आणि १६ ट्क्के मुलांकडे स्वतःचे लॅपटॉप आहेत. या यादीत पंधराव्या स्थानावर जगातील सर्वाधिक कोट्याधीश लोकसंख्या असलेला मोनॅको देश आहे. येथे ८७ टक्के लोक इंटरनेट कनेक्ट आहेत.

Leave a Comment