…तो पर्यंत मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही – पृथ्वीराज चव्हाण

prithviraj
मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोपर्यंत नरेंद्र मोदी सोलापूरसारखा प्रकार पुन्हा होणार नाही असे आश्वासन देत नाही, तोपर्यंत मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी गडकरींचाही खरपूस समाचार घेतला असून त्यांनी नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री असून आता संपूर्ण देशाचा विचार करावा असा टोलाही लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पृथ्वीराज चव्हाणांनी बहिष्काराचे भांडवल करून राजकीय पोळ्या भाजू नयेत अशी प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment