चंदा कोचर यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचा आदेश

chanda
लखनौ – आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर आणि क्रेडीट कार्ड ऑपरेशन प्रमुख विनय वळसे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश लखनौच्या मुख्य न्यायादंडाधिकार्‍यांनी लखनौ पोलिसांना दिले आहेत. क्रेडीट कार्ड फसवणूक व अफरातफर प्रकरणी हे आदेश दिले गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या बँकेचे क्रेडीट कार्ड असलेले इम्रान अहमद यांना २८ मे रोजी बँकेकडून सात मिनिटात तीन मेसेज आले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ७९ हजार रूपयांची खरेदी ऑनलाईन पद्धतीने तुर्कस्तानातून केली गेल्याचाही मेसेज आला. त्यावर अहमद यांनी त्वरेने बँक अधिकार्‍यांशी संपर्क साधला मात्र त्यांना कोणतीही माहिती दिली गेली नाही. त्यावर त्यांनी कार्ड ब्लॉक करून पोलिसांत तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनीही त्याची दखल घेतली नाही. अखेर त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावून कोचर व वळसे यांच्याविरोधात दावा दाखल केला.

या प्रकरणी न्यायदंडाधिकारी सुनीलकुमार यांनी लखनौ पोलिसांना कोचर व वळसे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा आणि या गुन्ह्याचा तपास करावा असे आदेश जारी केले.

Leave a Comment