अखेर मिळाली पुणे मेट्रोला मंजूरी; येत्या मंगळवारी मुंबई मेट्रो-३ चे भूमिपूजन

cm
मुंबई – केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत पुणे मेट्रोला तत्वत: मंजूरी दिली असल्याचे सांगितले असून मुंबई मेट्रो-३चे भूमिपूजन येत्या २६ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर केंद्र सरकार ठाणे शहरातही मेट्रो सुरु करण्याबाबत सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सकाळी राज्यातील नगरविकास विभागाचे विविध प्रकल्प व प्रश्नांसदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आज सह्याद्री अतिथीगृह येथे चर्चा झाल्यानंतर नायडू यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

नायडू म्हणाले, पुणे मेट्रोला केंद्राने मंजूरी दिली असून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानुसार आम्ही कोणत्याही प्रकारचा दुजाभाव केला असून राज्य सरकारला पुणे मेट्रोबाबत केंद्राने विविध पत्रे पाठविली. मात्र त्यावर राज्य सरकारने उत्तर न दिल्यामुळे हा विषय आता संपला आहे. आम्ही यात कोणतेही राजकारण करू इच्छित नाही. याबाबत वादही नको आहे कारण दोन्ही शहरात भाजपचेच खासदार आहेत.

मुंबईतील कुलाबा ते सीप्झ या मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाच्या भुमिपूजन समारंभ २६ ऑगस्ट रोजी होत आहे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले आहे त्यांनी उपस्थित रहावे असा चिमटा नायडूंनी मुख्यमंत्र्यांचा काढला. तसेच हा प्रकल्प डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण केला जाईल.

Leave a Comment