फोक्सवॅगनची वेंटो कनेक्ट सादर

vento
जर्मन वाहन कंपनी फोक्स वॅगनने सेदान श्रेणीतील त्यांची वेंटो कनेक्ट ही कार भारतात सादर केली असून यापूर्वीच्या वेंटोंची ही सुधारित आवृत्ती आहे. मुंबई शोरूम मध्ये तिची किंमत ७.८४ लाख रूपये आहे.

कंपनीचे अधिकारी मायकल मेयर म्हणाले की या नव्या कारमध्ये अनेक सोयी ग्राहकासाठी दिल्या गेल्या आहेत. आमच्या ग्राहकांनी नेहमीच कनेक्टिव्हीटी आणि डिजिटल मनोरंजनाची मागणी केली असल्याने यात ब्ल्यू टूथ तसेच सोशल नेटवर्क कनेक्टिव्हिटी दिली गेली आहे तसेच जीपीएस नेव्हीगेशन, ब्लापंक्ट इन्फोटेनमेंट सिस्टीमही दिली गेली आहे. पेट्रोल व्हर्जन ७.८४ लाख ते ९.८ लाखांपर्यंत आहेत तर डिझेल व्हर्जन ८.९९ ते ९.८ लाखांपर्यंत ग्राहकांना मिळू शकणार आहे.

Leave a Comment