पंकजा मुंडेंची संघर्ष यात्रा २७ ऑगस्टपासून

pankaja
मुंबई – भाजपचे दिवंगत खासदार आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे येत्या २७ ऑगस्टपासून राज्यात संघर्ष यात्रा सुरू करणार आहेत. या यात्रेदरम्यान त्या ३ हजार किमीचा प्रवास करणार आहेत. १४ दिवसांच्या या यात्रेत त्या विदर्भ, मराठवाडा, प.महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यातून फिरणार आहेत. या यात्रेत त्या ६६ मोठ्या तर २०० छोट्या सभा घेणार आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा यांच्या संघर्ष यात्रेच्या उद्घाटनास राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित राहणार आहेत. पंकजा यांच्या यात्रेदरम्यान राज्यातील तसेच केंद्रातील अनेक नेते सामील होणार आहेत. ७९ विधानसभा मतदारसंघ या यात्रेत पिंजले जाणार आहेत. या दरम्यान घेण्यात येणारा सभांमधून राज्य सरकारचा भ्रष्टाचार सर्वसामान्य जनतेसमोर उघड केला जाणार आहे. तसेच मुंडे समर्थकांची सहानुभूती मिळविण्यात पंकजा यशस्वी होतील व त्याचा फायदा विधानसभा निवडणुकांत होईल अशीही आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment