शरद पवारांचा धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठींबा

pawar
पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंब्याची घोषणा केली आहे.

त्यांनी राष्ट्रवादीची भूमिका धनगरविरोधी नसल्याचे स्पष्ट केले असून राष्ट्रवादीविरोधातच चुकीचा प्रचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धनगरांनाही आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता त्यांना मिळणा-या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.

शरद पवारांनी आपली भूमिका पुणे येथे एका पत्रकार परिषदेत मांडली. मात्र त्यांना तिस-या सूचीत नव्हे तर त्यांना पहिल्या सूचीत आरक्षण द्यावे असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे बबनराव पाचपुते यांच्या राजीनाम्यावरही यावेळी त्यांनी भाष्य केले. निर्णय घ्यायचा अधिकार प्रत्येकाला असल्याची पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना नऊ वेळा मंत्रीपद दिले हा अन्याय आहे का ? असा प्रश्न विचारत पाचपुते यांच्यावर कोणताही अन्याय केला नसल्याचे शरद पवार म्हणाले. आरक्षणाच्या मुद्यावरून पाचपुतेंनी राजीनामा दिला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment