धोनीने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले

dhoni
मँचेस्टर – कर्णधार महेंद्र सिंग धोनीने भारताचा इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवाचे खापर आघाडीच्या फलंदाजांवर फोडले आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा एक डाव आणि ५४ धावांनी दारुण पराभव केला असून इंग्लडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

सात, आठ, नऊ, दहा आणि ११ क्रमांकावर फलंदाजी करण्यास आलेल्या खेळाडूंनी सलामीवीर फलंदाजांपेक्षा चांगली कामगिरी केली असून आघाडीच सर्व फलंदाज साफ अपयशी ठरल्याचे धोनीने सांगितले. लॉडर्सवर रंगलेल्या दुस-या कसोटीतही फलंदाजांची चांगली कामगिरी राहिली नव्हती. या फलंदाजांपेक्षा संघातील पाच गोलंदाजांनी चांगली खेळी केली. तसेच इंग्लंडच्या खेळाडूंनीही चांगला खेळ केला. त्यांची गोलंदाजी फारच प्रभावी होती अशा शब्दात ढोणीने इंग्लंड संघाचे कौतुक केले.

Leave a Comment