बालगोविंदा आढळल्यास होणार कडक कारवाई

maria
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया हे यावर्षी दहिहंडी उत्सवात सहभागी होणा-या सर्व गोविंदा पथकावर करडी नजर ठेवणार असून, यामध्ये 12 वर्षापेक्षा कमी वयाचा गोविंदा आढळल्यास कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई पोलिसांची दहिहंडी संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर मारिया यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दहिहंडीत सामील होणा-या गोविंदांची वयोमर्यादा ही 12 वर्ष करण्यात आली असून यंदा दहिहंडीत 12 वर्षा खालील गोविदांचा सहभाग येणार नाही. सानपाडय़ातील एका गोविंदाचा सरावादरम्यान मृत्यू झाल्यामुळे आता पोलिसांनीही यावर कडक कारवाई करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

Leave a Comment