
नवी मुंबई – स्थानिक कर प्रणाली आणि व्हॅटविरोधात बंदचे हत्यार उपसले असून फेडरल ऑफ महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशनने ११ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. सरकारपुढे त्यांनी विविध मागण्या ठेवल्या असून त्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा त्यांनी दिला आहे.
११ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार पेट्रोलपंपधारक!
देशात इंधनावर सर्वाधिक कर महाराष्ट्रात द्यावा लागत असल्यामुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे.नागरिकांच्या खिशाला सर्वात जास्त चाप पेट्रोल आणि डिझेलवरील करामुळे बसत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात शेजारील सर्व राज्याच्या मानाने पेट्रोल डिझेलच्या दरात फार तफावत आहे. सरकारने ठरवलेले विविध कराऐवजी केवळ सरसकट ३० पैसे प्रती लिटर कर लावल्यास कराचे उद्दिष्ट पूर्ण होते, असा दावाही संघटनेने केला आहे.
