सिटी ओपन टेनिस स्पर्धेत बर्डीच, कार्लोव्हिक पराभूत

karlovic
वॉशिंग्टन – नवव्या मानांकित कार्लोव्हिक आणि झेकचा अग्रमानांकित बर्डीच यांचे येथे सुरू असलेल्या सिटी ओपन खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत आव्हान तिसऱया फेरीतच समाप्त झाले.

कार्लोव्हिकचा अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्ससने 3-6, 7-6, 7-6 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. जॉन्ससने या स्पर्धेत गेल्या बुधवारी आपल्या देशाच्या इस्नेरला हरविले होते. दुस-या एका सामन्यात कॅनडाच्या पोस्पिसिलने बर्डीचचा 81 मिनिटांच्या कालावधीत 6-2, 6-4 असा पराभव केला. कॅनडाच्या रेओनिकने ऑस्ट्रेलियाच्या हेविटवर 7-6, 7-6, जपानच्या निशीकोरीने लॅकोवर 6-2, 2-6, 6-3, फ्रान्सच्या गॅसकेटने अमेरिकेच्या स्मिझेकवर 6-3, 6-2, दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनने टय़ुनेशियाच्या जॅझेरीवर 6-3, 6-4 अशी मात केली.

महिलांच्या विभागात रशियाच्या मॅकरोव्हाने अमेरिकेच्या लॉरेन डेविसचा 6-2, 6-4, रशियाच्या पॅव्हेलचेंकोव्हाने जपानच्या कुवेटाचा 6-3, 6-3 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली.

Leave a Comment