भारतीय महिला हॉकी संघ पाचवा

hockey
ग्लासगो – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांनी पाचवे स्थान मिळविले असून पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात भारताने यजमान स्कॉटलंडचा 2-1 असा पराभव केला.

खेळाच्या उत्तरार्धात अनुप बर्ला आणि पूनम राणी यांनी या सामन्यात प्रत्येकी एक मैदानी गोल नोंदविला तर स्कॉटलंडचा एकमेव गोल निक्की किडने पेनल्टी कॉर्नर्रवर केला. 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय महिला हॉकी संघाला पदकापासून वंचित व्हावे लागले होते. भारतीय महिला हॉकी संघाने मँचेस्टर येथे झालेल्या 2002 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांकडून बचावात्मक खेळावर अधिक भर असल्याने गोलफलक कोराच राहिला पण उत्तरार्धात या सामन्यातील तीन गोल नोंदविले गेले. पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाला पात्रता फेरी खेळावी लागेल.

Leave a Comment