शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर 105 पॅलेस्टीनी ठार

gaza
जेरूसलेम : 105 पॅलेस्टीनी नागरिकांसह एक इस्रायल सैनिक इस्रायल आणि हमास यांच्यातील तीन दिवसांच्या शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यानंतर ठार झाले आहेत.

इस्त्रायलने गाझापट्टीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यानंतर हल्ले सुरू केले. यामध्ये राफा शहरात 35 पॅलेस्टीनी नागरिक ठार झाले. हमास च्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलचा सैनिक हदार गोल्डिन याचे अपहरण केले आहे. याची मोठी किंमत हमासला मोजावी लागेल, असा इशारा इस्त्रायल सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षा व कायदा मंत्री त्सिपी लीव्री यांनी दिला आहे.

दरम्यान, या सैनिकाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे हमासने म्हटले आहे.

Leave a Comment