तैवान; गॅस पाईपलाईन स्फोटात २४ ठार ,२७१ जखमी

taiwan
काओसियुंग – तैवानचे काओसियुंग शहर जमिनीखालून टाकण्यात आलेल्या गॅस पाईपलाईनमध्ये झालेल्या स्फोटांनी हादरले आहे. गुरुवारी रात्री या गॅस पाईपालाईनमध्ये लागोपाठ स्फोट झाले.

या स्फोटांमध्ये २४ नागरीकांचा मृत्यू झाला असून, २७१ जण जखमी झाले आहेत. हे स्फोट इतके भीषण होते की, काही रस्ते आगीच्या ज्वाळांनी वेढले गले तसेच अनेक रस्ते लांबपर्यंत उखडले गेले आहेत.काओसियुंग हे तैवानमधील दुसरे सर्वात मोठे शहर असून, या शहराची लोकसंख्या २८ लाख आहे. काओसियुंग शहरात मलनिसारण वाहिन्यांच्या बाजूला अनेक पेट्रोलियम कंपन्यांच्या गॅस पाईपलाईन आहेत.पाईपलाईनमधुन प्रोपीन वायूची गळती झाल्यामुळे हे स्फोट झाले असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. ढिगा-याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्य़ाचे काम सुरु आहे.गॅस गळतीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचून तपास करत असताना अचानक दुसरा स्फोट झाला. गॅस पाईपलाईनमध्ये पाच स्फोट झाल्याचे तैवानचे पंतप्रधान जियांग यी हुआ यांनी सांगितले

Leave a Comment