15 सुन्नी मुस्लिमांना इराकमध्ये शिया गटाने दिली फाशी

iraq
बगदाद : 15 सुन्नी मुस्लिमांना बगदादच्या बाकुबा शहरात इराकी शिया गटाने फाशी देवून त्यांना विजेच्या खाबांना लटकविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कट्टर शिया पंथीयांनी या भागात एका कार बॉम्बच्या स्फोटात 16 जण ठार तर आमीन या भागात 5 जण ठार झाले आहेत. शिया आणि सुन्नी या दोन्ही पंथाचे बाकुबमध्ये लोक राहतात. तेथील सुन्नी मुस्लिमांना मिळणारा पाठिंब कमकुवत करण्यासाठी त्यांना निघृणपणे मारण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह विजेच्या खांबाना लटकविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.