
ग्लासगो – नेमबाजीपाठोपाठ राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सर्वाधिक पदकांची अपेक्षा कुस्तीकडून असते. सलग दोन दिवशी सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकणा-या कुस्तीपटूंनी तिस-या दिवशीही तीन पदके निश्चित केली आहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत गितीका, बबिता
भारताच्या गितीका झकारने ६३ किलो फ्रीस्टाईल प्रकारात स्पर्धेच्या आठव्या दिवशी वेल्सच्या सराहचा ४-१ ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली असून उपांत्यफेरीत इंग्लंडच्या लुईसला हरवत बबिता कुमारीने ५५ किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
योगेश्वर दत्तनेही ६५ किलो वजनी गटात फ्रीस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने श्रीलंकेच्या छामरा पेरेराला १०-० असे नमवले. पुरुषांमध्ये पवनकुमारला मात्र उपांत्यफेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कांस्यपदकासाठी पवनची पुढील लढत पाकिस्तानच्या मोहम्मद इनामशी होणार आहे.
