माळीण; कृषी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

malin1
पुणे: तालुका कृषी अधिकाऱ्यांविरोधात माळीण गावातील दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडेगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश तळेकर यांच्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आला आहे.

दरड कोसळून काल सकाळी माळीण गाव संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले आहे. डोंगरावर केलेल्या शेतीमुळे ही दुर्घटना घडली असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांविरोधात हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

मोठ्या प्रमाणावर डोंगर पोखरून शेती केल्यामुळे संपूर्ण गाव उद्धवस्त झाले आहे. यामध्ये 30 हून अधिक लोकांना आपली जीव गमवावा लागला आहे.

Leave a Comment