मुंबईतही कोसळली दरड; बालकाचा मृत्यू

chembur
मुंबई : मुंबईत गेल्या सात दिवसांपासून कोसळणा-या पावसामुळे चेंबुर येथे दरड कोसळली असून या दुर्घटनेत एका पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत.

गुरूवारी सकाळी चेंबुर येथील पांजरपोळ भागातील अशोक नगरात कु-हाडे यांच्या घरावर दरड कोसळली. स्थानिक रहिवाशांनी तातडीने केलेल्या मदतकार्यामुळे घरातील पाच जणांना वाचविण्यात यश आले. मात्र, डोक्याला दगड लागल्याने रमेश कु-हाडे या पाच वर्षांच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर शताब्दी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, महापालिका अधिका-यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Comment