माळीण दुर्घटना; केंद्राकडून दोन लाखाची मदत

rajnath-singh
पुणे : केंद्र सरकारच्या वतीने माळीण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना दोन लाख रूपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी माळीण येथे दिली.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी माळीणमध्ये झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त माळीण गावाला भेट दिली. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ही दुर्घटना अत्यंत दुदैवी आहे. सध्या एनडीआरएफचे जवान व स्थानिक प्रशासनाकडून सुरू असलेले बचाव कार्य कौतुकास्पद आहे. माळीण गावाच्या पुर्नवसनासाठी राज्य सरकारला केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर मृतांच्या वारसांना पंतप्रधान सहायता निधीमधून प्रत्येकी दोन लाखाची मदत केंद्रीय गृहमंत्र्यांनी या वेळी जाहिर केली.