दहशतवाद्यांसाठी चक्क मॅरेज ब्यूरो !

marriage
ब्रिटन : इराक, सीरिया आणि मध्य पूर्वेतील देशांत दहशतवाद पसरवून जगभरात चिंतेची लाट निर्माण करणार्‍या ‘इस्लामिक स्टेट’च्या दहशतवाद्यांना आता बायकांची गरज भासत आहे. यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सीरिया) अर्थात ‘आयसिस’ने सीरियाच्या अलेप्पो प्रांतातील अल-बाब शहरात एक खास ‘मॅरेज ब्यूरो’ स्थापन केल्याची माहिती ब्रिटनस्थित सीरियाच्या एका मानवाधिकार संघटनेने दिली आहे.अल-बाबच्या अल-सराया नामक भागातील एका इमारतीत हे ‘मॅरेज ब्यूरो’ थाटण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून मुली व विधवा महिलांना ‘आयसिस’च्या सदस्यांसोबत लग्न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या ठिकाणी तशी रीतसर नोंदणीही करण्यात येत आहे. या कार्यालयाचा प्रमुख उद्देश कुमारिका व विधवा महिलांचे दहशतवाद्यांसोबत लग्न लावून देणे हा आहे, असा दावा ब्रिटनस्थित ‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्स’ने आपल्या फेसबुक पोस्टवर केला आहे.’