जुलै महिन्यात राज्यात ६१ टक्के पाऊस

rain
मुंबई – पावसाने जून महिन्यातील आपली गैरहजेरी यंदा जुलै महिन्यातील भरुन काढली आहे. राज्यात मान्सून सक्रीय झाला असून जुलै महिन्यात राज्यात ६१ टक्के पाऊस झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली असून ती ४२ टक्क्यांवर पोहचली आहे. गेल्यावर्षी हाच पाणीसाठा ५८ टक्के इतका होता.अर्थात राज्यात सरासरी ६१ टक्के पाऊस झाला असला तरी विभागवार विचार केल्यास त्यात मोठी तफावत आढळते. मराठवाड्यात केवळ १५ टक्के पाणीसाठा आहे. तर कोकण विभागात ७६ टक्के, नागपूर विभागात ६४, अमरावती विभागात ४५ टक्के, नाशिक विभागात २६ टक्के, तर पुणे विभागात ४६ टक्के पाणीसाठा असल्याचे अधिका-यांनी सांगितले. राज्यातील नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात २६ ते ५० टक्केच पाऊस झाला आहे.तर ठाणे, नंदुरबार, रायगड, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, अकोला, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात ५१ ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, वर्धा, नागपूर, गोंदीया या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ७६ ते १०० टक्के इतका पाऊस झाला आहे.

दमदार पावसानंतरही टँकरद्वारे पाणी – जुलै महिन्यातील दमदार पावसानंतरही राज्यातील एक हजार ४४५ गावांना आणि तीन हजार ६४० वाड्यांना एक हजार ६९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Leave a Comment