विकास ठाकुरला वेटलिफ्टिंगचे रौप्य

vikas-thakur
ग्लासगो – राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी 85 किलोग्रॅम पुरुष गटात अक्षरशः वेदनेने तळमळत असलेल्या विकास ठाकुरने रौप्य जिंकत संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. वेटलिफ्टिंगमध्ये यंदा भारताने उत्तम यश प्राप्त केले असून तीच मालिका विकास ठाकुरने कायम राखली.

ठाकुरने 333 किलोग्रॅम (150-183) वजन उचलत रौप्यपदकावर मोहोर उमटवली तर न्यूझीलंडच्या रिचर्ड पॅटरसनने एकूण 335 किलोग्रॅम (151-184) वजन उचलत सुवर्णपदक काबीज केले. कॅनडाचा पॅस्कल प्लमोन्डेन 333 किलोग्रॅमसह (151-182) कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

Leave a Comment