
ग्लासगो – 20 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा 3-0 असा एकतर्फी पराभव केल्यानंतर कांस्यपदकासाठीच्या लढतीत सिंगापूरने भारतावर 3-2 अशी मात केली.
मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये भारत चौथ्या स्थानी
भारताच्या पी. काश्यप आणि पी. व्ही. सिंधू यांनी भारत आणि सिंगापूर यांच्यातील झालेल्या लढतीत आपले एकेरीचे सामने जिंकले असून त्यानंतर दुहेरीचे तिन्ही सामने भारताला गमवावे लागले. मिश्र दुहेरीच्या पहिल्या लढतीत सिंगापूरच्या क्रिसेंटा आणि निओ यांनी भारताच्या गुरुसाईदत्त व अश्विनी पोनाप्पा यांचा 21-19, 21-19 असा पराभव केला. एकेरीच्या सामन्यात काश्यपने हुआंगचा 21-15, 22-20 असा पराभव केला. त्यानंतर क्रिसेंटा आणि ट्रियाचार्ट या जोडीने अक्षय दिवाळकर आणि प्रणव चोप्रा यांचे आव्हान 21-12, 21-16 असे संपुष्टात आणले. महिला एकेरीच्या सामन्यात पी. व्ही. सिंधूने लियांगचा 24-22, 22-13 असा पराभव केला. त्यानंतर महिला दुहेरीच्या सामन्यात सिंगापूरच्या याओ आणि शेरी यांनी ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनाप्पा यांचे आव्हान 21-17, 29-27 असे संपुष्टात आणले.
