… नरेंद्र मोदी नव्हे, तर मौनेंद्र मोदी; मुख्यमंत्र्यांची टीका

prithviraj1
मुंबई- नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर अनेक मुद्द्यावर सोयीस्कररीत्या मौन स्वीकारल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मात्र ती करताना मोदी हे नरेंद्र मोदी नव्हे, तर मौनेंद्र मोदी आहेत, असे नवे उपरोधिक नामकरण मुख्यमंत्री चव्हाण यांनी केले आहे.

पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर ही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ,सरकार चालवण्याची मोदींची पद्धत ही एकाधिकारशाहीची असून ती लोकशाहीसाठी चांगली नसल्याचेही पृथ्वीराज यांनी म्हटले आहे. मोदींनी दाखवलेल्या स्वप्नांना भुलणे ही चूक असल्याचे आता लोकांना कळू लागले असून उत्तराखंडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही याचा प्रत्यय आला.

अनेक महत्वाच्या मुद्द्यावर मोदींनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही, हे लक्षात आणून देतानाच, मुख्यमंत्र्यांनी मोदींची संभावना मौनेंद्र मोदी अशीही केली. मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्र्यांना काही स्थान, आदर उरला नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. आता या टीकेमुळे राजकीय वर्तुळात कोणती प्रतिक्रिया उमटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment