हिरव्या दाट झाडीतून कोसळणारा निवळीचा धबधबा

nivali
चिपळूणजवळील परशुराम घाट उतरताना उजव्या बाजूने वशिष्ठी नदीचे विहंगम दृश्य पावसाळ्यात नजरेचे पारणे फेडते. अशाच प्रकारचे काहीसे दृश्य मुंबई गोवा महामार्गावरून जाताना नदी व घाट चढून जाताना डाव्या बाजूने पाहायला मिळते. शेतीचे हिरवेगार पट्टे, कडेने वाहणारी नदी, पाश्र्वभूमीचे हिरवेगार डोंगर हे सर्व दृष्य पाहिल्यानंतर पर्यटकांचे पाय जागीच थबकले नाहीत तर नवल! निवळी घाट चढताना पर्यटकांना आकर्षित करतो तो हिरव्या दाट झाडीतून कोसळणारा निवळीचा धबधबा. निवळी धबधब्याचे मनोहारी दृष्य पाहण्यासाठी घाटातच पर्यटकांसाठी खास पॉइंट तयार करण्यात आला आहे. ज्या पर्यटकांना प्रत्यक्ष धबधब्याजवळ जायचे असेल त्यांच्यासाठी यावर्षीच पायऱ्यांचा मार्ग तयार करण्यात आला आहे. असंख्य पर्यटक निवळी धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी या धबधब्याजवळ जात असतात.

ठिकाणाचे नाव: निवळी धबधबा
जवळचे रेल्वेस्टेशन: भोके- अंतर १० किमी
जवळचे बसस्थानक: निवळी- अंतर ३ किमी

Leave a Comment