
मुंबई – आज हिट अँड रन प्रकरणाची पुढे ढकलण्यात आली असून मुंबई सत्र न्यायालयाने ही सुनावणी २१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.
२१ ऑगस्टला सलमानला मिळणार न्यायालयाची “किक”?
या प्रकरणातील साक्षीदार कल्पेश वर्मा आणि अमिन शेख यांनी दिलेल्या साक्षीची कागदपत्र गहाळ झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. एकूण ६३ कागदांपत्रांपैकी केवळ सातच कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध असल्याचे पोलिसांनी आज सांगितले. त्यामुळे ही कागदपत्रे शोधून काढण्यासाठी पोलिसांना आणखी वेळ देण्यात यावा अशी मागणी केल्यानंतर न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली.
२००२ मध्ये सलमान खानने भरधाव वेगाने गाडी चालवत फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते. यात चौघे जण जबर जखमी झाले. तर एकाचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी चालू आहे.
