पालेभाज्यांमधून इंधननिर्मिती;शास्त्रज्ञांचा दावा

vegetable1
वॉशिंग्टन : पालकासारख्या हिरव्या पालेभाज्यांमधून मिळणार्‍या ऊज्रेवर भविष्यात वाहने धावू शकतील, असे सांगितल्यास तुमचा विश्‍वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. सौरऊज्रेचे इतर पर्यायी इंथन स्रोतात रूपांतर करण्याची क्षमता असलेले पालकातील प्रथिन वेगळे करण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून यामुळे हे शक्य होणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

अमेरिकेतील प्युरड्यू व अँरिझोना विद्यापीठातील शास्त्रज्ञांना पालक भाजीत असणारे बहुपयोगी ‘फोटोसिस्टीम-२’ हे प्रथिन वेगळे करण्यात यश आले आहे. सौरऊज्रेचे इतर पर्यायी इंधन स्रोतात रूपांतर करण्याची क्षमता या प्रथिनात असल्याचे त्यांनी सांगितले. भाजीतून विलग केल्यानंतर शास्त्रज्ञांनी त्यावर लेसर प्रक्रिया करून त्याच्या अणूंमधील इलेक्ट्रॉनमध्ये होणार्‍या बदलांचा अभ्यास केला. यादरम्यान सक्रिय झालेल्या प्रथिनांवर पुन्हा अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने क्ष-किरण व इतर चुंबकीय प्रक्रिया करण्यात आली. या वेळी या प्रथिनांमध्ये सौरऊज्रेचे रासायनिक ऊज्रेत रूपांतर करण्याची क्षमता असल्याचे निदर्शनास आल्याचे या संशोधनाचे प्रमुख युलिया पुष्कर यांनी सांगितले. कृत्रिम प्रकाश संश्लेषणाद्वारे पर्यायी स्वच्छ इंधन स्रोताची निर्मिती करण्यासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. या संशोधनाद्वारे निर्माण केलेल्या इंधनावर वाहने धावू शकतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे भविष्यात अशा इंधनाची निर्मिती शक्य झाल्यास मानवासाठी हे संशोधन अत्यंत मोलाचे ठरू शकते.

Leave a Comment