मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात मँचेस्टर युनायटेड विजयी

manchester
पॅसेडिना – लुईस व्हान गाल यांच्या व्यवस्थापनाखाली बुधवारी येथे खेळविण्यात आलेल्या मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात मँचेस्टर युनायटेडने लॉस एंजिल्स गॅलेक्सीचा 7-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.

मँचेस्टर युनायटेडला गाल यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या व्यवस्थापकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हा पहिला विजय मिळाला. या सामन्यात मँचेस्टर युनाटेडच्या अनुभवी वेन रुनीने पूर्वार्धात दोन गोल केले. 42 व्या मिनिटाला रुनीने पहिला तर 45 व्या मिनिटाला त्याने दुसरा गोल नोंदविला. सामन्यातील 13 व्या मिनिटाला वेलबेकने मँचेस्टरचे खाते उघडले. सामन्याच्या उत्तरार्धात रेसी जेम्स आणि ऍस्ले यंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. शनिवारी मँचेस्टर युनायटेडचा सामना ए एस रोमा संघाविरुद्ध होणार आहे तर त्यानंतर 29 जुलैला वॉशिंग्टनमध्ये इंटर मिलान संघाशी मँचेस्टरची लढत होईल. 2 ऑगस्टला रियल माद्रिद बरोबर मँचेस्टरचा सामना डेट्रॉईट येथे खेळविला जाईल.

Leave a Comment