भारतीय संघाचे दर्जेदार कामगिरीवर लक्ष

hockey
ग्लॅस्गो – भारतीय पुरुष हॉकी संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला असून विश्व चषक हॉकी स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर सरदारसिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेत पदक मिळविण्याचा प्रयत्न करेल. भारताचा पहिला सामना येथे आज वेल्स संघाविरुद्ध होणार आहे.

भारताबरोबरच वेल्स, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका व विद्यमान विजेता आणि विश्वविजेता ऑस्ट्रेलिया यांचाही याच गटात सहभाग आहे. स्पर्धेच्या ड्रॉनुसार भारताला पहिले दोन सामने जिंकण्यात फारसे झगडावे लागणार नाही असे वाटते. ब गटात इंग्लंड, न्यूझीलंड, मलेशिया, कॅनडा, त्रिनिदाद-टोबॅगो या चार संघांचा समावेश आहे. भारताचा दुसरा सामना यजमान स्कॉटलंडविरुद्ध 26 जुलैला तर त्यानंतर 29 जुलैला बलाढय़ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या गटातील भारताचा शेवटचा सामना 31 जुलैला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. वेल्स आणि स्कॉटलंड विरुद्ध मोठय़ा गोलफरकाने भारत विजय मिळवेल, अशी आशा प्रमुख प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी व्यक्त केली आहे. 2010 साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 8-0 अशा गोलफरकाने पराभव केला होता.

Leave a Comment