काँग्रेसने धुडकावली राष्ट्रवादीची ऑफर

congress
मुंबई: आघाडीतील जागा वाटपाचा वाद विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर उफाळून आला आहे. काँग्रसने राष्ट्रवादी काँग्रेसची 144 जागांची मागणी सपशेल धुडकावून लावली असून राष्ट्रवादीला जास्तीत जास्त 130 जागा देण्याबाबत विचार करू, त्या मान्य नसतील तर त्यांनी खुशाल स्वबळावर लढावे, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

दुसरीकडे यापूर्वीच काँग्रेसकडे 144 जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरली आहे. यापेक्षा एकही जागा कमी करणार नसल्याचा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे.

मात्र आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादीला अंगावर घेतल्यामुळे राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, यापूर्वीही काँग्रेसने राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत एकही जागा वाढवून देणार नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे अल्टिमेटम काँग्रेसने धुडकावून लावले. जागावाटपासंदर्भात प्रश्न विचारला असता, राष्ट्रवादीला जागा वाढवून मागण्याचा प्रयत्नच येत नाही असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी म्हटले होते. त्यामुळे जागावाटपावरुन काँग्रेस- राष्ट्रवादीत वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

Leave a Comment