कर्णधारपदी अॅलेस्टर कुक कायम

cook
लंडन :इंग्लंडच्या राष्ट्रीय निवड समितीने भारतीय संघाकडून मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतरसुद्धा अॅलेस्टर कुकला कर्णधारपदी कायम ठेवले असून यष्टिरक्षक मॅट प्रायरच्या जागी जेस बटलरला संघात स्थान देण्यात आले आहे. प्रायरने लॉर्ड्स कसोटीनंतर जाहीर केले होते की, तो उर्वरित मालिकेत खेळणार नाही. या सामन्यात बटलर आपले पदार्पण करणार आहे. बटलरने इंग्लंडकडून 33 वनडे, 36 टी-2० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. इंग्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज कॅरिगनला संघाबाहेर ठेवले आहे. रविवारपासून तिसरी कसोटी साउथम्पटन येथे सुरू होणार असून, भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-० ने आघाडी घेतली आहे.

इंग्लंड संघ पुढील प्रमाणे : अॅलिस्टर कुक (कर्णधार), मोईन अली, जेम्स अॅँडरसन, गॅरी बॅलेंस, ईयान बेल, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, क्रिस जार्डन, लिअन प्लंकेट, सॅम रॉबसन, जो रुट, बेन स्टोक्स, क्रिस स्टोक्स.

Leave a Comment