आयएसआयएसने काढला महिलांचा सुन्ता करण्याचा फतवा

iraq
जिनीव्हा – आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने इराकमधील ११ ते ४६ वयोगटातील सर्व महिलांचा सुन्ता करण्याचा फतवा जाहीर करण्यात आला असून युद्ध प्रभावित राष्ट्रातील सुमारे ४० लाख महिलांवर याचा प्रभाव होणार आहे. या फतव्याबाबत इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अधिकारी जॅकलीन बडकॉक यांनी चिंता व्यक्त केली आहे.

इराक व उत्तर पश्चिमी क्षेत्रातील मोठ्या भागावर गेल्या महिन्यात आयएसआयएसने कब्जा केला होता आणि आता ते या भागातील नागरिकांवर आपले कट्टर विचार लादत आहेत. जॅकलीन यांच्या म्हणण्यानुसार, जर संयुक्त राष्ट्राकडून मिळालेली माहिती पाहिली, तर सुमारे ४० लाख मुली व महिलांवर या निर्णयाचा दुष्परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे इराकमध्ये महिलांचा सुन्ता करण्याची घटना पहिल्यांदाच घडत आहे.