सानियाचे भाजप नेत्याला प्रत्यूत्तर

sania-mirja
मुंबई : भाजपचे नेते लक्ष्मण यांना आपल्याला ‘पाकिस्तानची सून’ म्हणून हिणवणाऱ्या सानिया मिर्झाने सडेतोड प्रत्यूत्तर दिले आहे. ‘मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय असेन’ असे सानियाने म्हटले आहे.

‘राजकीय व्यक्तींच्या अशा व्यर्थ बडबडीमुळे मी खूप दुखावले गेले आहे’ असे सानियाने म्हटले आहे. ‘मला परकीय म्हणवणाऱ्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करते’ अशा शब्दांत तिने आपल्यावरच्या टीकेला उत्तर दिले आहे.

मुळची महाराष्ट्राची ‘सानिया मिर्झा रहिवासी आहे. ती नंतर हैदराबादमध्ये स्थानांतरीत झाली होती. त्यामुळे, तीही परकीय आहे. लक्ष्मण यांच्या म्हणण्यानुसार, स्वतंत्र तेलंगना राज्याच्या मागणीला झालेल्या आंदोलनातही सानिया कधी दिसली नव्हती. सानिया मिर्झाने पाकिस्तान क्रिकेटर शोएब मलिकशी विवाह केल्याने ती ‘पाकिस्तानची बहू’ आहे’ असं तेलंगनाचे भाजप नेते लक्ष्मण यांनी म्हटले होते. सानियाची तेलंगनाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे.

‘मी भारतीय आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत भारतीयच राहीन. माझं कुटुंब हैदराबादला गेल्या शतकाहून अधिक काळापासून वास्तव्यास आहे. भारतातील प्रमुख राजकारणी आणि मीडिया त्यांचा इतका मौल्यवान वेळ इतका शुल्लक गोष्टीसाठी वाया घालवत आहेत आणि यामुळेच मला जास्त वाईट वाटते आहे’ असे सानियाने म्हटले आहे.

Leave a Comment