गुगल मॅप आता चालणार आवाजावर

google
वॉशिंग्टन : प्रत्येक स्मार्टफोनधारक आज जवळपास प्रवासी रस्ता माहिती नसेल तर गुगल मॅपचा वापर करतो. अशा अँड्रॉईड असणा-या स्मार्टफोनचा वापर करणाऱया प्रवाशांना आता एक आनंदाची बातमी आहे. गुगलने नुकतेच आपल्या गुगल मॅप या ऍप्लिकेशनमध्ये सुधारणा घडवत, त्यात ‘व्हाईस कंट्रोल’ची सुविधा दिली असून जेणेकरून आता आपल्या आवाज्याच्या निर्देशावरून गुगल मॅप आपल्याला उचित स्थळी पोहोचवू शकते.

यासोबतच गुगलने ‘ऍलिवेशन’ नावाचे एक ऍप्लिकेशन आणले असून, याच्या वापराने आपण अचुकपणे उंची मोजू शकतो. याचा फायदा वाहनचालक, गिर्यारोहक आदींना होणार आहे. ही सुधारणा अँड्राईड 8.2 असणाऱया फोनला देण्यात आली आहे. मात्र, अँड्राईड 8.2 ची सुरुवात अद्याप भारतात उपलब्ध नाही.

Leave a Comment