रॉजर्स सोळाव्या टप्प्याचा विजेता

micheal
बॅगनरेस डी लुचाँ – टूर डी फ्रान्स सायकल शर्यतीत फ्रान्सचा रोमेन बार्डेट व अमेरिकेचा टीजे व्हान गार्डरेन यांच्या पदके मिळविण्याच्या आशेला मोठा धक्का बसला. या शर्यतीच्या सोळाव्या टप्प्यात ते खूपच मागे पडले असून या टप्प्याचे जेतेपद ऑस्ट्रेलियाच्या मायकेल रॉजर्सने मिळविले.

रॉजर्सने आपल्या संघाला या मोसमातील दुसरे जेतेपद मिळवून दिले. 237.5 किलोमीटर्सच्या या टप्प्यानंतर इटलीच्या व्हिन्सेन्झो निबालीने सर्वंकष आघाडीची पिवळी जर्सी स्वतःकडेच कायम राखली. स्पेनचा अलेजांड्रो व्हाव्हेर्डेने दुसरे व फ्रान्सच्या थिबॉ पिनॉने तिसरे स्थान मिळविले. बार्डेटला उंच चढावावर वेग राखता न आल्याने तो खूपच मागे पडला. व्हान गार्डरेनचीही तीच स्थिती झाली आणि त्याची मिनिटे वाया गेली.

Leave a Comment