
बीएमडब्ल्यू या जर्मन कार उत्पादक कंपनीने त्यांची बीएमडब्ल्यू अॅक्टीव्ह हायब्रीड ७ सेदान दिल्लीत लाँच केली असून तिची दिल्ली शोरूमची किंमत १ कोटी ३५ लाख रूपये आहे. ही गाडी देशभर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लग्झरी कार सेगमेंटमधील ही कार अनेक दृष्टीने अत्याधुनिक आहे.
बीएमडब्ल्यूची अॅक्टीव्ह हायब्रीड ७ लाँच
बीएमडब्ल्यूचे ग्रुप इंडिया अध्यक्ष फिलिप वोन सहर म्हणाले की ही नवी सेदान लग्झरी कार विभागात चालकाला अनोखा अनुभव देईल. गाडी चालविण्याचा असा अनुभव भारतातील चालक प्रथमच घेऊ शकणार आहेत. इलेक्ट्रीक मोटर व पेट्रोल इंजिनची यात जणू जुगलबंदी आहे. कारमध्ये फोल्डींग टेबलसह अनेक उत्तम सुविधा दिल्या गेल्या आहेत. कंपनी देशभरात २०१५ अखेर पर्यंत वितरकांची संख्या ५० वर नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनी या वर्षी त्यांचे आय ८ मॉडेलही भारतात सादर करणार आहे.
