इस्त्रालयलच्या हवाई हल्ल्यांत गाझातील वीज उत्पादन केंद्र नष्ट

gaza
इस्त्रायल सेनेने गाझा पट्टीत सुरू ठेवलेल्या हवाई हल्ल्यात येथील एकमेव विज निर्मिती केंद्र नष्ट झाले असल्याचे वृत्त आहे. इस्त्रालय वायूसेनेने हमासची मिसाईल गोदामे आणि सुरंगही नष्ट केले असून सतत १५ दिवस सुरू असलेल्या या हल्ल्यांत आत्तापर्यंत ६३० हून अधिक लोक मरण पावले आहेत. त्यात बहुसंख्य नागरिकांचा समावेश आहे. या युद्धात इस्त्रायलचे २९ सैनिक आणि २ नागरिकही मृत्युमुखी पडले आहेत.

इस्त्रायल आणि हमास मध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हा टापू अशांत बनला आहे. परिणामी अमेरिकेच्या डेल्टा व अमेरिका एअरलाईन्सने तसेच यूएस ने त्यांची इस्त्रायल विमानसेवा थांबविली आहे. यापूर्वीच जर्मनीच्या लुफ्तांसा, एअर फ्रान्स, युरोपियन कॅरिअर, हॉलंडच्या केएलएम, जर्मनीच्या बर्लीन एअरलाईन्स आणि नॉर्वेच्या बजेट एअरलाईन्सनीही आपली इस्त्रायल सेवा थांबविली आहे.