पुन्हा सज्ज झाला रोनाल्डो

ronaldo
टोकियो – पोर्तुगालचा अव्वल सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ब्राझिलमधील फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेतील कटू आठवणी मागे टाकत आता रियल माद्रिद संघाकडून चांगली कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे.

रोनाल्डोला विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेवेळी दुखापतीने दमविल्याने त्याची कामगिरी चांगली होऊ शकली नाही. पोर्तुगाल संघाला बाद फेरीत प्रवेश मिळविता आला नाही. प्राथमिक फेरीमध्ये पोर्तुगालने आपल्या गटातून एक सामना जिंकला तर एक सामना गमविला आणि एक सामना बरोबरीत राखला.

या संपूर्ण स्पर्धेत रोनाल्डोला केवळ एकमेव गोल नोंदविता आला. रोनाल्डोच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीतून आता तो पूर्णपणे बरा झाला असून स्पॅनिश फुटबॉल स्पर्धेत रियल माद्रीद संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहिल असेही रोनाल्डोने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. टोकियोत एका कार्यक्रमाला तो उपस्थित होता. क्लब स्तरावर आपण आणखी किमान सहा ते सात वर्षे खेळण्याचा प्रयत्न करु असेही रोनाल्डोने सांगितले.

Leave a Comment