ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धा आजपासून

glasgow
ग्लासगो- आज मोठ्या उत्साहात स्कॉटलंडच्या ग्लासगो येथे विसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा दीप प्रज्वलित आज रात्री 11.30 वाजता ग्लासगो येथे सुरू होणार्‍या 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेचे उद्घाटन महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते होणार आहे. सेल्टिक पार्क येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात रॉकस्टार रॉड स्टीवर्ट, सुजैन बोयल, एमी मॅकडोनाल्ड आणि ज्युली फोलिस कलागुण सादर करणार आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कॉटलंड येथील 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाला खास शुभेच्छा दिल्या. भारताचा 215 सदस्यीय संघ स्पर्धेत सहभागी झाला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या सर्व खेळाडूंना माझ्याकडून शुभेच्छा, असेही मोदी म्हणाले.

पुन्हा एकदा पदकांचे शतक झळकवण्यासाठी या स्पर्धेत भारतीय संघ सज्ज झाला आहे. मागील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 101 पदके जिंकून पदक तालिकेत दुसरे स्थान गाठले होते. यंदाच्या स्पर्धेत भारताचा 215 सदस्यीय संघ स्पर्धेत सहभागी झाला आहे. हे सर्व खेळाडू 14 खेळ प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मात्र, यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघासमोर इंग्लंडच्या खेळाडूंचे तगडे आव्हान असेल. त्यामुळे पदक तालिकेत भारताची तिसर्‍या स्थानी घसरण होण्याची शक्यता आहे.

यांच्याकडून आहेत भारतीय संघाला पदकाच्या आशा
थाळीफेक – विकास गौडा, कृष्णा पुनिया, सीमा अंतिल
400 मी. रिले- टिटू लुका, अश्विनी अंकुजी
बॅडमिंटन- पी. व्ही. सिंधू, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा (महिला दुहेरी)
लांब उडी-मयुखा
मुष्टियुद्ध – विजेंद्र सिंह, शिवा थापा, सुमीत सागवान, देवेंद्र सिंह
शूटिंग-अभिनव, जयदीप, गगन नारंग, हिना सिद्धू, राही सरनोबत.
स्क्वॅश- दीपिका पल्लिकल, जोशना चिनप्पा, सौरव, हरमिंदर
ज्युदो- गरिमा
टेबल टेनिस- ए. शरथ कमल, सौम्यजित घोष, अंकिता दास, पलोमी घटक
कुस्ती-सुशीलकुमार, योगेश्वर दत्त
बॅडमिंटन- पॅरा स्किइंग प्रशांत कर्मकार
हॉकी- पुरुष आणि महिला संघ

Leave a Comment