अदानी ऑस्ट्रेलियात उभारणार रेल्वेमार्ग

adani
नवी दिल्ली – क्वीन्सलँडमध्ये (ऑस्ट्रेलिया) गॅलिली बेसिन कोळसा भांडारापर्यंत रेल्वेमार्ग उभारण्यासंबंधी अदानी ग्रुपची कंपनी अदानी मायनिंग आणि दक्षिण कोरियाची कंपनी पॉस्कोची शाखा ईअँडसीने करार केला आहे.

रेल्वे प्रकल्पाद्वारे कारमिकेल खाण योजना सुरू होणार आहे ज्याद्वारे रोजगाराच्या १०००० नव्या संधी निर्माण होणार आहेत. लोकांना ऑस्ट्रेलियन उद्योगात सामील होण्याची संधी मिळणार असल्याचे अदानी ग्रुपने म्हटले आहे. या करारातंर्गत पॉस्को ईअँडसीला ३८८ किलोमीटर नवा रेल्वेमार्ग स्थापन करण्यासंबधी इंजिनियरिंग, खरेदी आणि निर्माणाचे कंत्राट मिळणार आहे. या करारानुसार अंतिम कंत्राट या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.

Leave a Comment