पोलिसाच्या नावावर चोराने मागविला पिझ्झा

pizza
कोणतीही ऑर्डर न देता पिझ्झा डिलिव्हरी बॉयने एकदम पाच गरमागरम पिझे तुरूंगात आणून दिल्याने न्यूर्यार्कमधील पोलिस अधिकार्‍यांवर आश्चर्यचकीत होण्याची पाळी आली. मात्र पोलिस बजावत असलेल्या सेवेचे कौतुक म्हणून हे पिझ्झा आले नव्हते तर पोलिसांनी चोरीच्या आरोपावरून पकडून आणलेल्या मायकेल हार्प या चोरट्याची ती किमया होती असे नंतर आढळून आले.

समजलेली हकीकत अशी की २९ वर्षीय मायकेल हार्पला दुकानात चोरी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पकडून तुरूंगात आणले. मात्र त्याला कडकडून भूक लागली होती. त्याने पोलिस अधिकार्‍याचा मोबाईल मिळवून त्यावरून पाच पिझ्झाची ऑर्डर दिली. पिझ्झाची डिलिव्हरी दिली तेव्हा पोलिस चकीत झाले. ज्या पोलिस अधिकार्‍याच्या फोनवरून ऑर्डर दिली गेली होती, त्याने कॉलचे रेकॉर्ड तपासले तेव्हा मायकेलची किमया उघडकीस आली. पोलिसांनी मायकेलवर मोबाईलमधील वैयक्तीक माहिती वापरल्याबद्दल दुसरी केस ठोकली. पण मायकेल इतका भुकेला होता की त्याने प्रथम मला पिझ्झा खाऊ दे मग हवे ते करा असे शांतपणे पोलिसांना सांगून केसमधील हवाच काढून टाकली.

Leave a Comment