टूर डी फ्रान्समध्ये नॉर्वेचा क्रिस्टॉफ विजेता

Alexander-Kristoff
निमेस – टूर डी फ्रान्स सायकलिंग स्पर्धेतील 15 वा टप्पा नॉर्वेचा सायकलस्वार ऍलेक्सझांडेर क्रिस्टॉफने जिंकला. नॉर्वेच्या क्रिस्टॉफने आपला नजीकचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या जॅक बॉरला टॅलेर्ड ते निमेस दरम्यान 222 कि. मी. पल्ल्याच्या या टप्प्यात थोडक्या अंतराने मागे टाकले. या स्पर्धेतील क्रिस्टॉफचे हे दुसरे विजेतेपद आहे.

15 व्या टप्प्यात जर्मनीच्या हॉस्लेरने दुसरे स्थान तर स्लोव्हाकियाच्या सॅगेलने तिसरे स्थान मिळविले. इटलीच्या निबालीने या शर्यतीत सर्वंकश आघाडी कायम राखली आहे.

Leave a Comment