चेक रिपब्लिकला भारताचा फुटबॉल संघ रवाना

football
नवी दिल्ली – १९ दिवसांच्या दौ-यासाठी भारताचा २३ वर्षाखालील फुटबॉल संघ चेक रिपब्लिकला रवाना झाला. आगामी इंचेऑन आशियाई स्पर्धेची तयारी म्हणून या दौ-याकडे पाहिले जात आहे.

२५ सदस्यीय भारताच्या संघात तीन गोलकीपर, सात डिफेंडर, आठ मिडफिल्डर आणि सात फॉरवर्डचा समावेश आहे. सुनील छेत्री, रॉबिन सिंग आणि फ्रान्सिस फर्नाडेस या सिनियर्सनाही दौ-यात संधी मिळाली आहे. चेक रिपब्लिकमध्ये भारताचा मुक्काम पिल्सेनमध्ये राहील.

सेंको डाउब्रावका, एफके मोस्ट आणि टीजे डोमॅझलिस या चेक रिपब्लिकच्या तीन क्लबसोबत भारतीय संघ सामने खेळेल. दौ-यावरून परतल्यानंतर १७ आणि २० ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध भारत दोन मैत्रीपूर्ण लढती खेळेल. त्यानंतर २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान भारतीय संघ चीनचा दौरा करेल. त्यात शांघाय एफसी आणि जियांग सु या क्लबविरुद्धच्या लढतींचा समावेश आहे.

Leave a Comment