चेल्सीत पुनरागमन करणार ड्रोग्बा

drogba
लंडन – अव्वल फुटबॉलपटू डिडेर ड्रोग्बा चेल्सी फुटबॉल क्लब बरोबर एक वर्षाचा नवा करार लवकरच करणार असल्याची माहिती फ्रान्सच्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे. ड्रोग्बा गॅलेटेसेरी क्लब बरोबर यापूर्वी 18 महिन्यांचा करार केला होता. हा करार संपुष्टात आला असून चालू आठवडा अखेरीस तो चेल्सीमध्ये पुनरागमन करणार आहे. यापूर्वी चेल्सी संघाकडून खेळताना ड्रोग्बाने 157 गोल नोंदविले होते.

Leave a Comment